पाचोऱ्यात शासन आपल्या दारी योजनेत ११ हजार नागरीकांना विविध शासकीय योजनांचा लाभ…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पाचोरा एम. एम. विद्यालयाच्या प्रांगणात शासन आपल्या दारी ही योजना राज्यात प्रथमच तालुका स्तरावर राबविण्यात आली. कार्यमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आ. लता सोनवणे, आ.संजय सावकारे, आ. जयकुमार रावळ, आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, आयुष्य राधाकृष्ण पाटील, पोलीस आयुक्त बी. जी. शेखर पाटील, जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसिलदार प्रविण चव्हाणके, गटविकास अधिकारी अतुल पाटील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, मधूकर काटे, डॉ. प्रियंका पाटील, सुमित पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपरिषद, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभागाच्या विविध ११ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. यात प्रतिनिधीक स्वरूपात शामकांत जोशी, रेखा गोरे, रेखा मोरे, गणेश ठोंबरे,सचिन पाटील,साबेरा अहमद, धृवास पाटील, समर्पित वाघ, आकाश बिल, भागवत बोरसे, गणेश राठोड, प्रविण राठोड, पल्लवी पाटील यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल, गोठा शेड, ट्रॅक्टर, शबरी योजनेत घरकुल या योजनेचा लाभ देण्यात आला. तर रोजगार विभागातर्फे १६ युवक युवतींना नियुक्ती पत्र देण्यात आले, कार्यालयात पाचोरा व भडगाव तालुक्यातील सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयम् सेविका आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका महसूल, पंचायत समिती, नगरपरिषद, कृषी, विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव येथे विमानाने आगमन झाल्यानंतर ते तालुक्यातील हडसन गावी हेलीपॅडने पाचोरा येथे १ वाजुन २० मिनिटांनी सभास्थळी आल्यावर दुपारी ३ वाजुन १० मिनिटांनी नांद्रा येथे रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ वाजुन ४४ वाजता भाषण केल्यानंतर ३ वाजुन ८ मिनिटांनी भाषण संपले. पाचोरा येथील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौक ते जळगाव चौफुली पर्यंत २० ठिकाणी त्यांचेवर क्रेन द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली, कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते पाचोरा व भडगाव तालुक्यातील ५३५ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन ई प्रणाली द्वारे करण्यात आले. यात प्रामुख्याने नगरदेवळा येथील औद्योगिक वसाहत, काकनबर्डी येथे शूशोभिकरण, ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, दोन जॉगिंग ट्रॅक, दोन्ही तालुक्यातील १६ लहानमोठ्या पूलांचे भुमिपूजन, दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स, तीन कोटी भडगाव येथील रोड, ४५ कोटीचा भडगाव व ५५ कोटीची पाचोरा येथील पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व सरपंचांना फेट बांधून त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे स्थळी नगरपालिका, पंचायत समिती, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते.

 

३७३ पोलिस अधिकारी व कर्मचारी होते तैनात

पाचोरा येथील शासन आपल्या दारी योजना यशस्वी करण्यासाठी आय. जी. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, ५ पोलीस उपअधीक्षक,२० पोलीस निरीक्षक, २० पोलिस उपनिरीक्षक व ३२५ पोलीस कर्मचारी नांद्रा ते कार्यक्रम स्थळापर्यंत तैनात करण्यात आले होते. नगरदेवळा येथील शाहिर शिवाजीराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा गायनाने सुरवात केली. जळगाव येथील पोलीस बॅंड पथकाने उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमात महिलांसाठी पाचोरा तालुक्यात २६ तर भडगाव तालुक्यात १४ बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थी व नागरीकांना त्याचा त्रास सोसावा लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.