कुंड्यापाणी ग्रामस्थांची आठ दिवसांपासुन पाण्यासाठी भटकंती

0

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

बिडगाव-कुंड्यापाणी गृपग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुंड्यापाणी येथे आठ दिवसांपासुन पिण्याचे पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांची रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे.ग्रामपंचायत च्या दुर्लक्षामुळे हाल होत असल्याचा आरोप येथिल ग्रामस्थांनी केला आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले कुंड्यापाणी गावात गेल्या आठ दिवसांपासुन पिण्याचे पाणी मिळत नाही. येथे असलेले रोहीत्र जळाल्यामुळे सदर परीस्थिती उद्भवली आहे. याबाबत येथिल ग्रामस्थांनी सरपंच यांच्याविषयी रोष व्यक्त करत आहे. सध्या उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे. यातच पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ, लहान मुले, अबालवृद्ध भटकंती करावी लागत आहे. सदर परीस्थिती गंभीर असल्याने पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात येत आहे. तरी कुंड्यापाणी येथे असलेले दोन्ही हातपंप हे नादुरुस्त आहे. तरीही ग्रामपंचायत ने दुरुस्ती करण्याची तसदी घेतली नाही. यामुळे अतोनात हाल होत आहेत. तरी संबंधित रोहीत्र हे कायमस्वरुपी सुरु ठेवुन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.

पाणी मिळावे यासाठी येथील ग्रामस्थांची जंगलात भटकंती सुरु आहे. तसेच शेतात जाऊन, विहीरी हून झ-यातुन गावात पाणी आणत आहेत. काहीजण बैलजोडीने, पायपिट करुन पाणी भरत आहे. तरी सदर पाणी पिण्यायोग्य नाही. तरीही तहान भागवण्यासाठी ग्रामस्थांना सदर पाणी प्यावे लागत आहे. पेसा अंतर्गत गावाला समस्या कुंड्यापाणी हे गाव आदिवासी पेसा बहुल भागात येते. तात्काळ समस्या सुटावी अशी आशा येथील आदिवासी बांधवांना आहे. गेल्या वर्षीही सप्टेंबर महीन्यात तब्बल वीस दिवस येथिल ग्रामस्थांना पाणीपुरवठा मिळाला नव्हता.तरी कायमस्वरुपी सदर समस्या निकाली काढावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. अधिकारींनी गावात राहीले पाहीजे. तेव्हा त्यांना येथिल ग्रामीण ग्रामस्थांची विशेष आदिवासी बांधवांच्या समस्या सुटतील.सदर समस्या वारंवार होत असल्याने गटविकास अधिकारी यांची भेट घेणार आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.