खामगावात ठाणेदाराची पत्रकारांसोबत गैरवर्तणूक, माफी मागीतल्याने प्रकरण निवळले

0

खामगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पोलीस प्रशासन व जनता यामधील महत्वाचा दुवा म्हणुन ओळखल्या जाणा­या पत्रकारांना सौजन्याची वागणूक देण्याऐवजी तुसडेपणाची भूमिका घेऊन गैरवर्तणूक करण्याचा प्रकार नुकतेच रुजु झालेले शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील करीत आहेत. सुरुवातीला छुप्या स्वरुपातील हा प्रकार काल रात्री उघडपणे झाल्याने पत्रकारांमध्ये रोष निर्माण झाला होता. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून अखेर ठाणेदार पाटील यांनी पत्रकारांची माफी मागितल्याने सदर प्रकरण निवळले. ठाणेदार पाटील यांनी सामजंस्याची भूमिका घेऊन अशांती माजविण्याचा प्रयत्न थांबवावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

यासंदर्भात वृत्त असे की, 23 एप्रिल 2023 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास खामगांव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले (Kishorappa Bhosale) एका घटनेप्रकरणी माहिती जाणुन घेण्यासाठी शहर पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. यावेळी ठाणेदार पाटील यांना त्यांनी आपला परिचय सुध्दा दिला. पण पत्रकारांची ऍलर्जी म्हणून की काय? ठाणेदार पाटील यांनी चक्क किशोरआप्पा भोसले यांना लोटपाट करुन पोलीस स्टेशन बाहेर हाकलून देण्याचे आदेशही पोलीस कर्मचा­यांना दिले. एवढेच नव्हेतर कलम 353 नुसार कारवाई करण्याचे सांगीतले होते. कर्मचा­यांनी याकडे कानाडोळा केला. यावेळी काही पत्रकार बांधव सुध्दा उपस्थित होते. सदर प्रकरणाची माहिती मिळताच शहरातील बहुतांश पत्रकार बांधव शहर पो. स्टे. मध्ये हजर झाले होते. प्रकरण चिघळत असल्याचे पाहताच अखेर ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी पत्रकारांची माफी मागितल्याने तुर्त प्रकरण निवळले. विशेष बाब म्हणजे या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतरही कोणीही वरिष्ठ पोलीस अधिकारी शहर पो. स्टे. मध्ये आले नाही.

बुलडाणा जिल्हा वाहतुक शाखेतून नुकतेच शहर पो. स्टे. ठाणेदार म्हणुन रुजू झालेले शांतीकुमार पाटील यांनी पदभार सांभाळताच सकाळी शहरातील अवैध वरली मटक्याच्या अड्ड्यावर धाडी टाकल्या व संध्याकाळी सर्वकाही सुरळीत झाले. यानंतर ठाणेदार यांना शहर पो. स्टे. मध्ये पत्रकारांचे येणे खटकू लागले. याबाबत त्यांनी काही पत्रकारांंना हटकले सुध्दा मात्र या प्रकरणी जास्त गवगवा झाला नाही. पण ही बाब जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कानावर गेली असल्याचे समजते. दरम्यान शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे जिवंत उदाहरण म्हणजे काही दिवसापूर्वी शंकरनगर भागातील काही महिलांनी शहर पोलीस स्टेशन आवारातच ठिय्या मांडला होता. यामुळेच ठाणेदार पाटील यांना पत्रकार खुपत असावे, असे बोलल्या जात आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिका­यांनी वेळीच दखल घेऊन ठाणेदार शांतीकुमार पाटील यांना समज द्यावी व पत्रकारांसोबत सहकार्याची भूमिका ठेवण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी पत्रकार बांधवांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.