चारचाकीने कठड्याला दिली धडक, चालक जागीच ठार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भरधाव कारने पुलाच्या कठड्याला धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) पहाटे सव्वाअकराच्या सुमारास जानवे गावाजवळ घडली.

भगवान दलपत सपकाळे (वय ६३, रा. गिरणा पंपिंगजवळ, जळगाव) हे विजया भगवान कोळी (वय ५५) आणि कुंतला भगवान कोळी (वय २४) यांच्या सोबत कारने जात असतांना (एमएच १९, एएक्स ६४५३) जानवे गावाजवळ हॉटेल फाल्गुनी जवळील पुलाच्या कठड्याला जोरदार धडकल्याने चारचाकी पलटी झाली व त्यात भगवान सपकाळे जागीच ठार झाले. विजया आणि कुंतला कोळी या दोघी जणी जखमी असून, त्यांना परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेने उपचारासाठी धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सादर घटना कळताच सहायक निरीक्षक हरिदास बोचरे व पोलिस कर्मचारी कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला. पोलिस पाटील विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून मृत भगवान सपकाळे यांच्याविरुद्ध स्वतःच्या मृत्यूस व दोघांना जखमी करण्यास कारणीभूत ठरले म्हणून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील पुढील तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.