अमळनेर येथे पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमळनेर तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे तमाशात पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिंदखेडा तालुक्यातील लालखेड येथील वीज कर्मचाऱ्यांवर सरकारी कामात आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे रात्री ९ च्या सुमारास गायमातेच्या यात्रेनिमित्त लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. दि. १० रोजी पहाटे १२.३० च्या सुमारास अचानक हुल्लडबाजी झाल्याने त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या मारवाड पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल भरत ईशी, भरत गायकवाड, पोलीस पाटील केशवराव दगा पाटील यांनी लोकांना करत घरी जाण्यास सांगितले.

त्यावेळी प्रदीप आनंदा शिरसाठ रा. वालखेडा ता. शिंदखेडा याने भरत ईशी यांना शिवीगाळ करत, धक्काबुक्की करून खाली पडले, गर्दी आणि गोंधळ बघता शिरसाळ्याचे पोलीस पाटील रामचंद्र चौधरी, कळंबुचे पोलीस पाटील जयसिंग राजपूत, मांडळचे सुरेश पाटील व मुडी येथील प्रणव पाटील, रवींद्र पाटील, अनिल भोई यांनी आवरा आवर केली. एवढा झाल्यावर सुद्धा प्रदीप शिरसाठ यांनी “तुझा काटा काढतो” म्हणत धमकी दिली. हेडकॉन्स्टेबल भरत ईशी यांनी मारवाड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे करत आहे. प्रदीप शिरसाठ हा फरार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.