जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील सांगावी येथील ३६ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ११) दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास घडली. येथील राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील म्हसवे चौफिलीजवळ सांगावी येथील रहिवासी संदीप उर्फ आबा शालीग्राम पाटील (वय ३६) हे सांगावी होऊन दुचाकीने (एमएच १५, एचझेड ७८४६) सांगवीकडून पारोळ्याकडे येत असतांना अज्ञात वाहनाने दुचाकीने धडक दिली.
याबाबत घटनेची माहिती ज्ञानेश्वर रामोशी यांनी फोनद्वारे दिल्याने घटनास्थळी सांगावी येथील प्रवीण पाटील, भास्कर देवरे, नथ्थू पाटील व ग्रामस्थ दाखल झाले. या वेळी जखमी अवस्थेतील संदीप पाटील यास उपचारासाठी १०८ ग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात दाखल केले. या वेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेबाबत पारोळा पोलिसात जामसिंग पाटील (रा. सांगवी) फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार नाना पवार तपास करीत आहे.