हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
हैदराबादमध्ये एक अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
अग्निशमन दलाचं युद्धपातळीवर काम
या दुर्घटनेत व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अग्निशमनदलाचे कारकर्ते लोकांना वाचवतांना दिसत आहे. इमारतीच्या खिडकीत शिडी लावून महिला आणि लहान मुलांना वाचवतांना दिसत आहे. आगीचं स्वरूप इतकं भीषण होत की, ती आज लागल्यानंतर ती इतकी वेगानं पसरली की इमारतीतील लोकांना बाहेर पडतासुद्धा आले नाही. या आगीत एक बाळंही अडकून पडलं होतं, पण त्याला पोलिसांनी सुखरुपरित्या बाहेर काढलं आहे.
गोडाऊनला आग
पोलीस उपायुक्त व्यंकटेश्वर राव यांच्या माहितीनुसार, हैद्राबाद बाजारघाट परिसरात ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये ६ रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील गोडाऊनला आग लागल्याने ती वेगानं इमारतीत पसरली.