यावल येथील विद्युत डीपी वर बिघाड झाल्याने उपकरणे जळाली

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

काल यावल येथील देशमुख वाडा, बस मळा परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास अचानकपणे डिपी मध्ये बिघाड झाल्याने दूरदर्शन संच, घरातील बल्ब व इतर वस्तु यातुन धुर निघु लागल्याने घराबाहेर येत नागरिकांनी एकमेकांना विचारपूस केली असता, सुमारे शंभरच्या आसपास घरातील इलेक्ट्रिक उपकरणे जाळल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत वृत्त असे की, रात्री पावणेनऊचे सुमारास शहरांतील देशमुख वाडा भागातील बसमळा व तरकेश्र्वर मंदिर परिसरातील नागरीक आपापल्या घरात असताना अचानकपणे घरातील टीवी व बल्ब यांचेतून धुर निघु लागला व उपकरणे जळ्याल्याची घटना घडली. नागरिकांनी घराबाहेर येत एकमेकांची विचारपूस केली असता अनेकांचे उपकरणे जळाली असल्याची माहिती समोर आली. परिसरातील रहिवासी दाऊ पहेलवान, पंकज पाटील व इतरांनी विद्युत वितरण कंपनीचे कार्यालयात धाव घेतली परंतु त्या ठिकाणी शहर अभियंता उपस्थीत नसल्याने सदरची घटना यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांना कळविली. अतुल पाटील यांनी दखल घेऊन तत्काळ विद्युत वितरण कंपनी चे अभियंता वाघुलदे यांचेशी भ्रमणध्वनी संपर्क साधुन माहिती दिली. यावल शहरातील रेणुका देवी मंदिर परिसरातील डीपी क्र.१२वरील न्युट्रल तार हाई व्होल्टेज मुळे तुटल्याचे निदर्शनास आले. व त्यामुळेच उपकरणे जळाली असल्याची माहिती समोर आली. तत्काळ डीपी बंद करून दुरुस्ती करण्यात आली.

भरपाई द्यावी-अतुल पाटील
नुकसान झालेले नागरीक विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक आहेत. ज्या परिसरातील उपकरणे जळाली त्या भागातील नागरीक शेतकरी व शेतीवर अवलंबून असणारे आहेत हाय व्होल्टेज मुळे डीपी वरील न्युट्रल तार तुटल्याने ग्राहक यांचे नुकसान झाले आहे. यास सर्वस्वी विद्युत वितरण कंपनी जबाबदार असल्याने त्यांनी रीतसर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. स्थानिक पातळीवर दाद न दिल्यास वरीष्ठ अधिकारी यांचेकडे अथवा ग्राहक न्यायालयात तक्रार करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.