जळगावात पुन्हा एकदा अवैध गुटखा जप्त

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. नाशिक आयजीच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे १० लाखांचा गुटखा जप्त केल्याने अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. भगवान साहेबराव पाटील (रा. आव्हाणे, ता.धरणगाव) असे अटकेतील गुटखा मालकाचे नाव आहे. आरोग्यास अपायकारक अन्न पदार्थ असलेला रजनीगंधा पान मसाला, आरएमडी पान मसाला, राजनिवास पानमसाला, विमल पान मसाला, व्हिवन तंबाखू, जाफरानी जर्दा व एम. सेंटेड तबाखू साठा गुरुदेव नगर परिसरातील रॉयल इन्फिल्ड शोरूम शोरूम पाठीमागच्या एका गोदामातून जप्त करण्यात आला.

नाशिक आयजीच्या विशेष पथकाने ही कारवाई शुक्रवार, १० रोजी ४.५० वाजेच्या सुमारास केली. याप्रकरणी रवी पाडवी यांच्या फिर्यादीनुसार भगवान साहेबराव पाटील (३०, आव्हाणे, ता. धरणगाव) व अरुण पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदामातून ९ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीची गुटखा, २३ हजारांची रोकड व दोन वाहने मिळून १९ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ घाटवडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.