दिल्ली महामार्गावर भीषण अपघात, १०० वाहनांचे नुकसान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

धुक्यांमुळे दृश्यमानता कमी झाल्याने अमृतसर दिल्ली महामार्गावर अनेक वजने एकमेकांवर आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर, १२ जण जखमी झाले आहेत. पंजाबमधील खन्ना येथे ही दुर्घटना घडली आहे. या मार्गावर एकमेकांवर धडकल्या आणि खराब झालेल्या लांबच लांब रंग लागल्या आहेत.

पंजाबच्या लुधियाना येथील खन्ना भागात अनेक वाहने आदळली असून, धुक्यांमुळे विलालाच्या सुरुवातीला रस्त्यांवरील दृश्यमानता कमी झाली आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी थांबलेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सोबतच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी सुद्धा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या घटनेमध्ये १०० वाहनांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.