तरुणीचा नग्नावस्थेत अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

मारेकऱ्यांचा सुगावा देणाऱ्यास ५० हजाराचे बक्षीस

0

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली तालुक्यातील असोला शिवारात खून करून पुरावे नष्ट करण्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अंढेंरा पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. घटनेतील गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

असोला तालुका चिखली येथील गेल्या काही दिवसांपासून हॉटेल राजवाडा ही बंदावस्थेत आहे. त्या हॉटेलच्या मागच्या बाजूस साधारण २० ते २२ वय असलेल्या  तरुणीचा अर्धवट जळलेल्या नग्नावस्थेत पोलिसांना मिळून आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत जवळपास 30 हजार मीसिंग केसेस तपासल्या असता त्या मृत तरुणीची ओळख अद्याप पटू शकली नाहीय. ठाणेदार संदीप पाटील यांनी मारेकऱ्यांचा सुगावा देणाऱ्यास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच सदर व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.

पोलिसांनी लोणारपासून संग्रामपूर पर्यंत देऊळगाव राजापासून शेगाव पर्यंत जेवढेही सरपंच पोलीस पाटील तंटा मुक्त समिती अध्यक्ष आहे, यांना कळविले की गावातील कोणी रागावून घर सोडून अथवा पळून गेलेली व्यक्ती असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करा. 7972506442 या नं वर संपर्क करा असे आश्वासित केले आहे.

बेनामी व्यक्तिविरुद्ध खून करून पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर मृत तरुणी ही जिल्हाबाह्य किंवा राज्यबाह्य असल्याचे सुत्रांच्या हवाल्याकडून सांगितले जात आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.