बापरे ! नवऱ्याशी झालं भांडण, बायकोने घरच पेटवले

0

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नवरा बायकोच्या भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील मात्र छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील एन-२ परिसरातील नालंदा सोसायटीत राहणाऱ्या नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून बायकोने पेट्रोल टाकून चक्क घर पेटवून दिले.

यामध्ये घरातील सर्व सामान जळून राख झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. त्याची झळ आजूबाजूच्या घरांना देखील बसली. या आगीत ५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, आग लागताच स्थानिक नागरिकांनी याची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन विभागाचे कर्मचारी बंबासह घटनास्थळी दाखल झाले. तिसऱ्या मजल्यावर आग लागलेली असल्याने आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी मेहनत घ्यावी लागली. २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या यश आले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.