विहिरीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

यावल शहरालगतच्या विरावली शिवारात असलेल्या विहीरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला असून याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

या संदर्भात मिळालेली अशी की, यावल शहरापासुन सुमारे दोन किलोमिटर लांब चोपडा मार्गावरील दरबारसिंग शांताराम पाटील यांच्या विरावली शिवारातील शेतात सुमारे १३० फुट खोल असलेल्या विहीरीत पडून ३०ते ३५ वर्ष वयाचा अज्ञात इसम मरण पावल्याची घटनासमोर आली आहे.

आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी शेतात कामास गेलेल्या महीलांना विहीरीतुन दुर्गंध आल्याने त्यांनी शेतमालकास सदर बाब सांगितली. त्यानंतर शेतमालक दरबारसिंग यांनी सदरची माहीती पोलिसांना दिली. त्यानंतर मृतदेह विहिरीतून काढण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.