‘मी अर्थमंत्री राहिल की नाही..’,अजित पवारांचे मोठे विधान

0

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उपमुख्यमंत्री अजित पवार २३ सप्टेंबर रोजी बारामतीच्या दौऱ्यावर होते. अजित पवारांनी बारामतीत विविध विकासकामांची पाहणी करत बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही अजित पवारांनी घेतली. यानंतर एक कार्यक्रमात बोलतांना अजित पवारांनी मोठे विधान केल्याने चर्चेला उधाण केले आहे.

काय म्हणाले पवार 

अजित म्हणाले की, “आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं अर्थखातं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही, “बारामतीत ४२ कोटी रूपये खर्च करून क्रीडा संकुलाचं काम सुरू झालं आहे. त्यासाठी मार्केट कमिटीला ५ कोटी रूपये देऊन जागा घेण्यात आली आहे. म्हणजे मार्केटला जागा देताना मी फुकट देतो, पण त्यांची जागा घेताना ५ कोटी दिले”.

म्हणून आपल्याला झुकतं माप

तसेच उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री असताना अनेक योजनांच्या फाइल्स आमच्यापुढं यायच्या. त्यात बघायचं कुठल्या, कुठल्या गावांची नावे आहेत. मग, बारामतीचं नाव नसेल, तर टाकायचं आणि सही करायची. अशा पद्धतीने आपल्याला ४२ कोटी रूपयांचं मॅग्नेटचं काम मिळालं. टोरंटो सीएनजी गॅस एजन्सी देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच खरेदी विक्री संघासाठी टोरंटो गॅस एजन्सी घेतली. शेवटी आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखात आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही. मात्र, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. तिथे चूका होत असतील, तर दुरूस्त केल्या पाहिजेत असे देखील अजित पवार म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.