दावोस परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून राज्यात 10 हजार रोजगार निर्माण होतील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहे. या माध्यमातून सुमारे 10 हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन

या कंपन्यांसोबत झाले करार

ग्रीनको एनर्जी प्रोजेक्ट्स – 12, 000 कोटी
बर्कशायर हाथवे होम सर्व्हिसेस ओरेन्डा इंडिया – 16, 000 कोटी
ICP गुंतवणूक/ इंडस कॅपिटल – 16,000 कोटी
रुखी फूड्स – 250 कोटी
निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया – 1650 कोटी

मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मंगळवारी लक्झमबर्गचे पंतप्रधान, जॉर्डनचे पंतप्रधान, सिंगापूरचे माहिती व दूरसंचार मंत्री, जपान बँक, सौदी अरेबियाचे उद्योग व खनिकर्म मंत्री, स्वीस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासमवेत भेटी घेणार आहेत. विविध क्षेत्रांतील नामवंत उद्योगांसमवेत सामंजस्य करारही महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये करण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.