दाऊद इब्राहीमने केला दुसरा निकाह ; एनआयएच्या आरोपपत्रातून उघड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पाकिस्तानात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने दुसरा निकाह केला असून त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानच्या एका पठाण कुटुंबातील असल्याची माहिती दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या मुलाने गतवर्षी सप्टेंबर महिन्यात NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिलेल्या जबाबात दिली आहे.

तपास यंत्रणेने काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टेरर नेटवर्कचा भांडाफोड करत मुंबईसह काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात अनेकांना अटक केली होती. त्यानंतर तपास यंत्रणेने हसीनाचा मुलगा अलीशाह याचा सप्टेंबर 2022 मध्ये जबाब नोंदवला होता. त्यात अलीशाहने दाऊदने दुसरा घरोबा केल्याचा सनसनाटी खुलासा केला. NIA ने यासंबंधीचे एक आरोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. त्यातून हा गौप्यस्फोट झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.