शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच – संजय राऊत

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाला मिळे याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देणार असले तरी महाराष्ट्रात शिवसेना कुणाची हा प्रश्नच उपस्थित होत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे, असा दावा आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, शिवसेना कुणाची? या तांत्रिक मुद्द्यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडमूक आयोगाने ज्या पद्धतीने गेले काही निर्णय दिले, त्याबाबत आमची नाराजी आहे. शिवसेना कुणाची हा प्रश्न महाराष्ट्रात तरी आता विचारला जात नाही.

देशात शिवसेना एकच आहे आणि ही शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचीच आहे. त्यांच्याशिवाय शिवसेनेवर कुणीही दावा करु शकत नाही. आम्हाला नक्की न्याय मिळेल. असे संजय राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.