राज्यात पुढील ३ दिवस थंडीचा कडाका राहणार !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून थंडीची लाट सुरू आहे. सोमवारी किमान तापमानात अंशत: वाढ झाली होती, मात्र थंडी कायम होती. आगामी २ दिवस थंडीची लाट कायम रहाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सोमवारी निफाड येथे नीचांकी ६.५ अंश तापमान नोंदवले गेले. उत्तर भारतात सलग २ पश्चिमी चक्रवातामुळे डोंगराळ भागात परिसरात बर्फवृष्टी होत आहे. उत्तरेकडील गार वाऱ्यांमुळे राजस्थान, गुजरातसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात किमान तापमान घसरले.

हवामान विभागानुसार १९ जानेवारीनंतर दोन पश्चिमी विक्षोभांच्या प्रभावामुळे कडाक्याची थंडी आेसरू लागेल. पहिला विक्षोभ १८ तर दुसरा २० जानेवारीला सक्रिय होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.