बक्सरमध्ये भाजपच्या नेत्याचे हृद्यविकाराने निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
विविध मागण्यांसाठी बिहारमधील बक्सरमध्ये भाजपच्या वतीने आंदोलन केले जात होते. तेव्हा आंदोलनात हातात बॅनर घेवून व घोषणाबाजी करित असलेले भाजप नेते परशुराम चतुर्वेदी हे धाडकन कोसळून खाली पडले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूमुळे बक्सरमधील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

आंदोलनात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. दुपारी तीन वाजेच्या सुमारास बक्सरमधील भाजप नेतेमंडळी मीडियाला संबोधित करित होते. तेव्हा त्यांच्या पाठीमागे उभे असलेले भाजप नेते परशुराम चतुर्वेदी हे धाडकन कोसळून खाली पडले. तेव्हा सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना दोन किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.