विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून पावणेचार कोटींचा दंड वसूल

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्य रेल्वेने भुसावळ विभागात दिवाळीच्या काळात गर्दीचा गैरफायदा घेत, प्रवास करणाऱ्या ४१ हजार रेल्वे प्रवाशांकडून सुमारे पावणेचार कोटींचा दंड वसूल केला. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांण्डेय यांच्या मार्गदर्शनाच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग, सहायक वाणिज्य व्यवस्थापक रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ विभागातील ५३७ तिकीट तपासणीस सहभागी झाले.

९ ते १५ नोव्हेंबर अशा आठवड्यात दिवाळीसाठी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याचा फायदा घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटांची शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात, भुसावळ विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहीम राबवून भुसावळ विभागाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. दिवाळी सुट्टीच्या या काळात विनातिकीट, अनधिकृत प्रवास करणाऱ्या ४१ हजार ८९४ प्रवाशांकडून ३ कोटी ७३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

त्यामुळे नोव्हेंबर महिण्यात भुसावळ मंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक तिकीट तपासणीच्या आज पर्यंतच्या दंड वसुलीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एकूण ७ हजार ३७० प्रवाशांकडून ६८.८५ लाख रुपये दंड वसूल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.