शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, कृषीमंत्री दादा भुसेंचं आवाहन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. जूनचा पहिला आठवडा उलटला तरी राज्यात मान्सूनच्या सरी बरसलेल्या नाहीत. यामुळे  पेरणीची कामं करावी की, नाही? अशा द्विधा मनस्थितीत बळीराजा आहे. मात्र मान्सून उशीरानं येत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

.. म्हणून बळीराजा चिंतेत 

यंदा मान्सून लवकर हजेरी लावणार, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. पण अद्याप राज्यात मान्सूनचा पत्ता नाही. कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशातच कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

पाऊस पुरेसा झाला नाही तर.. 

यंदा मान्सून उशीरा येत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, किमान 80 ते 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी करु नये, असं दादा भुसेंनी सांगितलं आहे. पाऊस पुरेसा झाला नाही, तर दुबार पेरणीची वेळ येईल, त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी काही काळ पावसाची वाट पाहावी, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केलं करण्यात आलं आहे.

मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला

राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. उकाड्यानं लोकं अगदी हैराण झाली आहेत. यामुळे सर्वचजण पावसाची वाट पाहत आहेत. मात्र राज्यात अद्यापही उष्णतेची लाट जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्यून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे.

ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला

कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढला आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.