चोरीच्या संशयातून हातपाय बांधून दंडुक्याने मारहाणीत वॉचमनचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

औरंगाबाद :शहरातील विवेकानंद नगर येथील मेघवाले सभागृहात मनोज आव्हाड वॉचमन म्हणून काम करत करणाऱ्या वॉचमनला फोकस लाईट्स चोरीच्या संशयातून आठ जणांनी हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. मारहाण करणाऱ्या एकाने घाटी रुग्णालयात दाखल केलेल्या गंभीर जखमी वॉचमनला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मनोज शेषराव आव्हाड असे मृताचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगरसेवकाचा मुलगा असल्याची माहिती आहे.

शहरातील विवेकानंद नगर येथील मेघवाले सभागृहात मनोज आव्हाड वॉचमन म्हणून काम करत असे. मनोज पत्नी आणि मुलांसह सभागृहाच्या एका खोलीत राहत. या सभागृहाचे काम माजी नगरसेवक गणपत खरात यांचा मुलगा सागर खरात हे पाहतो. येथेच सतीश खरे मंडपचे काम करतो. काही दिवसांपूर्वी येथील मनोजची पत्नी माहेरी गेली आहे. यातच त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. यामुळे बुधवारी तो चंपाचौक येथे राहणाऱ्या आईकडे गेला होता.

दुपारी ३ वाजेच्या दरम्यान सतीश खरे सात आठ मुलांसोबत चंपाचौक येथील घरून मनोजला मंडप कामासाठी म्हणून घेऊन गेला. त्यानंतर मनोजला मेघवाले हॉल येथे आणत फोकस लाईट्सच्या चोरीचा जाब विचारण्यात आला. यावेळी वाद झाल्याने सतीश खरे, सागर खरात, आनंद सोळस, आनंद गायकवाड, अष्टपाल गवई,  सागर खरातचा भाऊ आणि इतर तिघांनी हातपाय बांधून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात मनोज गंभीर जखमी झाला. संध्याकाळी गंभीर जखमी मनोजला घाटी रुग्णालयात दाखल करून मारहाण करणारा अष्टपाल पसार झाला. येथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले

विशेष म्हणजे, मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने मनोजच्या भावाला मारहाणीचा व्हिडीओ पाठवला. तेव्हा मनोजला भाऊ आणि आई कार्यक्रमानिमित्त शेंद्रा येथे होते. व्हिडीओ पाहताच त्यांनी औरंगाबाद येथील सतीश खरेचे घर गाठले. मात्र तो घरी नव्हता,त्यानंतर ते मेघवाले सभागृहात आले, तेथेही लॉक होते. दरम्यान, मनोजला घाटी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्यांना मिळाली. घाटी रुग्णालयात जाताच आव्हाड कुटुंबियांना मनोज मृत झाल्याचे समजले.

Leave A Reply

Your email address will not be published.