Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»संतापजनक.. प्रेमविवाहानंतर पती झाला हैवान; गर्भवती पत्नीला चालत्या ट्रेनमधून फेकलं
    ताज्या बातम्या

    संतापजनक.. प्रेमविवाहानंतर पती झाला हैवान; गर्भवती पत्नीला चालत्या ट्रेनमधून फेकलं

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 23, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    नवी दिल्ली ; उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर पती हैवान झाला आहे. एका तरुणाने आपल्यासोबत फिरायला चल असं सांगून बाहेर नेलं आणि नंतर गर्भवती पत्नीला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकलं आहे.

    गर्भवती महिला गंभीर अवस्थेत रात्रभर ट्रॅकवर पडून होती. त्यानंतर सकाळी काही लोकांनी महिलेला अशा अवस्थेत पाहिलं आणि तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    पोलिसांनी पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पतीने चालत्या ट्रेनमध्ये आधी तिचा गळा दाबला. त्यानंतर तिला ट्रेनमधून बाहेर फेकून दिलं. ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती रेल्वे ट्रॅकवर पडलेली पाहायला मिळाली.

    नेहा असं या महिलेचं नाव असून ती गर्भवती आहे. नेहा पंजाबच्या लुधियानामध्ये राहते. ती एका कम्पूटर इन्स्टीट्यूटमध्ये टीचर म्हणून काम करत होती. तिथेच ज्ञानचंद शर्मा नावाचा तरुण शिकायला यायचा.

    लग्नानंतर वारंवार छोट्यामोठ्या कारणांवरून वाद

    क्लासमध्ये नेहा आणि ज्ञानचंदची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी कोर्टात जाऊन लग्नही केलं. लग्नानंतर मात्र वारंवार त्यांच्यात छोट्यामोठ्या कारणांवरून वाद होत होते. सासरची मंडळी मानसिक आणि शारीरीक छळ करायची.

    सासू हुंड्यासाठी नेहमीच टोमणे मारायची. तसेच मुलाला सुनेबद्दल वाईट गोष्टी सांगून भडकवायची. यानंतर पती आपल्याला मारहाण करत असल्याचं नेहाने म्हटलं आहे. तिने आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता.

    चालत्या ट्रेनमध्ये नेहाचा गळा दाबला आणि बाहेर फेकलं

    लखनऊला घेऊन जातो असं सांगून पती तिला मनकापूर रेल्वेस्टेशनवर घेऊन आला. त्यानंतर चालत्या ट्रेनमध्ये नेहाचा गळा दाबला आणि बाहेर फेकलं. जखमी अवस्थेतील महिलेला स्थानिकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

    या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस देखील या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

    crime news New Delhi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif