आई आणि बहिणीची छेड काढण्यापासून रोखले; गुंडांनी दहावीच्या विद्यार्थ्यावर गोळ्या झाडल्या…

0

 

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

हरियाणातील पलवल येथे 10 वीच्या विद्यार्थ्याने आई आणि बहिणीची छेड काढणाऱ्या तीन हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला गोळ्या घालण्यात आल्या. ही घटना गुरुवारी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकेश असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्यावर पलवल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश गुरुवारी आई आणि बहिणीसोबत घरी जात असताना रस्त्यात दुचाकीवरून जात असलेल्या तीन चोरटय़ांशी त्यांचा सामना झाला. यानंतर एका व्यक्तीने त्याच्या आई आणि बहिणीची छेडछाड सुरू केली, तेव्हा लोकेशने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि तिघांपैकी एकाने बंदूक काढून लोकेशवर गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढला. गोळी थेट लोकेशच्या हातात लागली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. लोकेशच्या आई आणि बहिणीने त्याला तात्काळ रुग्णालयात नेले जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती लोकेशच्या काकांना कळताच त्यांनी पोलिसांना बोलावून गुन्हा दाखल केला. यानंतर आता पोलिसांनी तिघांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेशवर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीचे नाव बदहारा येथील कोकन असे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.