बँकेने जप्त केलेल्या घरावर चोरटयांनी मारला डल्ला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील जुना खडीरोड बैठक हॉल शेजारील मिळकत आयडीबीआय बँकेने थकीत कर्जापोटी नुकतीच ताब्यात घेतली आहे. या बंद घरात चोरटयांनी आत शिरून आवश्यक दस्तऐवज आणि साहित्य लंपास केल्याची शक्यता असून बँक अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिसांत गुन्ह्यात नोंद करण्यात आली आहे. आयडीबीआय बँकेचे वसूल अधिकारी राजेश रामनाथ जैस्वाल (वय ३५) यांनी यासंदर्भात तक्रार दिली.

जुना खेडीरोड बैठक हॉल शेजारील रहिवासी मधुकर सुदामराव देवकर (वय ५०) यांनी आयडीबीआय बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यापोटी त्यांचे राहत्या घरावर गृहकर्ज घेतले होते. कर्जाचे हफ्ते थकीत असल्याने मंगळवार (दि.१३) रोजी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांसह पथकाने ही मालमत्ता कायद्याने ताब्यात घेतली.

जप्तीनंतर ८ दिवसांनी मंगळवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी या बंद घराच्या मुख्यदाराचा कांडीकोयंडा तोडून आता शिरून आतील साहित्यांची उलथापालथ करून महत्वाचे दस्तऐवज किंवा साहित्य चोरून नेल्याचा अंदाज आहे. घरफोडी झाल्याचे कळताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.