Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»ATM मधील ६५ लाखांचा अपहार; तिघांना अटक
    गुन्हे वार्ता

    ATM मधील ६५ लाखांचा अपहार; तिघांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 19, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली रोख रक्कम पूर्ण न भरता वेळोवेळी रक्कम काढून तब्बल ६४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक  प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील आणि इतर तालुक्यात असलेले एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी बँकेने एका खासगी कंपनीला दिली आहे. याच विश्वासाने बँकेने वेळोवेळी कंपनीचे नोकर असल्याने एटीएममध्ये रोख रकमेचा भरणा करण्यासाठी दिलेले असताना संशयित आरोपी प्रवीण देविदास गुरव, दीपक भिकन पवार दोन्ही रा. पाटणादेवी रोड, आदित्य नगर, चाळीसगाव या दोघांनी दिलेली रक्कम एटीएममध्ये पूर्ण न भरता त्यातून वेळोवेळी थोडी थोडी अशी एकूण ६४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा अपहार केला आणि कंपनीचा विश्वासघात केला.

    तसेच ऑडिटर चंद्रशेखर गुरव यांनी ऑडिट दरम्यान हा प्रकार कंपनीच्या निदर्शनास आणून न देता खोटे ऑडिट अहवाल सादर करून अपहर करणाऱ्या दोघांना मदत केली आणि कंपनीचे फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे कर्मचारी गोरक्षनाथ पोपट डोंगरे (वय ३८, रा. नाशिक) यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता संशयित आरोपी प्रवीण देविदास गुरव, दीपक भिकन पवार दोन्ही रा. पाटणादेवी रोड, आदित्य नगर, चाळीसगाव आणि त्यांना मदत करणारा ऑडिटर चंद्रशेखर एकनाथ गुरव रा. गुजरात पेट्रोल पंपाजवळ, निवृत्ती नगर, जळगाव अशा तिघांविरोधात कंपनीचा अपहर केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी  पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहे.

     

    #chalisgaon crime news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif