जळगाव : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जाणाऱ्या ट्रक चालकाने क्लीनरच्या पायावर ट्रक घेवून जात गंभीर जखमी केले. ही घटना दि. १८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील तोल काट्यासमोर घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांबापुरा परिसरात अशपाक हबीब पिंजारी हा तरुण वास्तव्यास असून तो ट्रकवर क्लीनर म्हणून काम करतो. दि. १८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ट्रक चालक रज्जाक रसूल पिंजारी रा. तांवापूरा हा (एमएच १८, एम ५१३१) क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने चालवित होता. यावेळी ट्रक चालकाने अशपाक पिंजारी याच्या पायावरुन चालवून नेत त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी क्लीनरने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ विजय पाटील हे करीत आहे.