फळविक्रेत्या मुलाला सळईने दोन जणांनी केली मारहाण

0

जळगाव : दोन जणांनी  किरकोळ कारणावरुन फळ विक्रेता असलेल्या एकनाथ वसंत खरसाने यांच्यासह त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. तसेच त्यांना लोखंडी सळईने मारहाण करीत गंभीर जखमी केले.

ही घटना दि. १७ रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास समता नगरातील धामनगाव वाडा परिसरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, समता नगरातील धामनवाड्यात एकनाथ वसंत खरसाने हे वास्तव्यास असून त्यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे.

दि. १७ रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरुन आबा धनराज सोनवणे यांच्यासोबत वाद झाला. या वादाचे रुपांतरण हाणामारीत होवून आबा सोनवणे व त्यांच्या मुलीने एकनाथ खरसाने व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी लोखंडी सळई त्यांच्या हातावर मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी दि. १९ रोजी आबा धनराज सोनवणे व त्यांच्या मुलीविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.