तांब्याचे तुकडे विकणाऱ्या ऑपरेटरच्या मुसक्या आवळल्या

0

जळगाव ;-कंपनीमधून वेस्टेज तांब्याचे तुकडे विकणाऱ्या ऑपरेटरच्या मुसक्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या असून तुकडे घेणाऱ्या भंगार विक्रेत्यालाही ताब्यात घेतले आहे. दोघानविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की एमआयडीसी परिसरात स्पेक्ट्रम इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे या कंपनीत इलेक्ट्रिक फिटिंगचे वायर तयार करण्याच्या कामे केली जातात. त्यासाठी तांब्याचे तार व तुकडे लागत असतात, दरम्यान याच कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करणारा सुरेश ओंकार वाघ (वय-४१), रा. पंढरपूर नगर, जळगाव यांनी कंपनीमधून निघालेले ९ हजार रुपये किमतीचे दहा किलो वेस्टेज तांब्याचे तुकडे चोरी केल्याचे २७ फेब्रुवारी रोजी उघडकीस आले होते. याप्रकरणी कंपनीतील मॅनेजर चंदन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, मशीन ऑपरेटर सुरेश वाघ यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तो फरार झाला होता, एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत सुरेश वाघ याला अटक केली तर त्याने हे तांब्याचे तुकडे सोनुसिंग रमेश राठोड, (वय-२३), रा. सुप्रीम कॉलनी जळगाव यांच्याकडे विक्री करायसाठी दिले होते. त्यामुळे पोलिसांनी सोनूसिंग राठोड याला देखील अटक केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, सचिन पाटील, राहुल रगडे, साईनाथ मुंढे, नितीन ठाकुर, ललीत नारखेडे अशांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.