८ लाखात गंडविणारे दोघे जेरबंद

0

जळगाव : विम्यावर अधिक बोनस व मेडिकल कव्हर मिळवून देण्याचे अमिष दाखवत ८ लाख ९५ हजार ६४६ रुपयांमध्ये फसवणूक करणाऱ्या अवदेशकुमार रामकिशोर (वय २४) व रामप्रसाद निशाद लल्लू निशाद (वय २५, रा. उत्तर गोवा) यांना गोवा येथून सायबर पोलिसांनी अटक केली. गोव्यातून आवळल्या मुसक्या; चेकबुक, डेबीटकार्डसह साहित्य हस्तगत
सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सायबरच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी तांत्रिक विश्लेषण केले. यामध्ये तक्रारदार यांनी ज्या बँक खात्यात पैसे भरले होते, ते देशभरातील विविध राज्यातील असल्याची माहिती तपासात उघड झाली होती.

फसवणुक करणाऱ्यांनी मंडगाव, गोवा येथील एटीएममधून बहुतांश वेळा खात्यावरून रक्कम काढल्याचे समजले होते. त्यामुळे संबंधित बँकेकडून तेथील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले. त्याद्वारे संशयितांना निष्पन्न करुन अवदेशकुमार रामकिशोर व रामप्रसाद निशाद लल्लू निशाद या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून मोबाईल, सिमकार्ड, चेकबुक, डेबिट कार्ड व इतर साहित्य हस्तगत केले आहेत.

ही कारवाई सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिगंबर थोरात, पोहेकॉ दिलीप चिंचोले, पोकॉ गौरव पाटील, दीपक सोनवणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ ईश्वर पाटील, पोहेकॉ प्रवीण वाघ, राजेश चौधरी यांच्या पथकाने करुन या गुन्ह्याचा छडा लावला.

Leave A Reply

Your email address will not be published.