जळगावातून महिलेची सोनसाखळी लांबविली

0

जळगाव :- बाजारपेठेत खरेदी आलेल्या कल्पना दिनकर पाटील (वय ४०, रा. दत्त कॉलनी) या महिलेची ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबवली. ही घटना दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शहरातील केळकर मार्केट ते फुले मार्केट दरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल ग करण्यात आला आहे.

शहरातील दत्त कॉलनीत कल्पना दिनकर पाटील या वास्तव्यास असून दि. १२ फेब्रुवारी रोजी त्यांची मैत्रीण माया फुलपगारे यांच्यासोबत खरेदीसाठी मार्केटमध्ये आल्या होत्या. त्यांच्याजवळ असलेल्या हॅण्डपर्समधील चपिशवीत गळ्यातील ोन्याची पोत ठेवलेली होती. त्या दोघी मैत्रीणी केळकर मार्केटच्या गल्लीतून
.
फुले मार्केटकडे जात होत्या. त्या वेळी अचानक कोणीतरी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोनपोत चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने शोध घेतला, मात्र पोत न सापडल्याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रफुल्ल धांडे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.