पोलिसांसोबत विनाकारण हुज्जत घालणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वरणगाव येथे गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुजत घालून त्यांना धमकावत सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याऱ्या विरोधकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरिक्षक भरत चौधरी, सह फैजदार ईस्माईल शेख (चालक) पो.हे.कॉ अतुल बोदडे हे मुक्ताईनगर उप विभागीय कार्यालयात जाऊन गाडी (क्र.एम.एच १९ सी.डी ८५९२) या शासकीय वाहनाने वरणगावकडे गस्त घालत असतांना, शहरातील रहिवासी निजाम शे कलीमोद्दीन शेख हा सोनार गल्लीत रात्रीच्या साडे अकरा वाजता, स्वतः ची ओळख लपवून, तोंडावर रुमाल बांधून, संशयीतरित्या मोटर सायकलीवर फिरत होता. तरुणास जाब विचारला असता, त्याने पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तुम्ही मला का थांबवलं?, गाव माझे आहे मी कुठेही फिरू शकतो, असे वारंवार तो म्हणत होता.

पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, थांबा तुमचा बेतच पाहतो, तुमची पोलीस कंट्रोलला बदलीच करतो. असे म्हणत चालक इस्माईल शेख यांना धक्काबुक्की करीत शासकीय वाहनाच्या गाडीचे नुकसान करून पळून जाण्याचा प्रयत्न करून व पोलिसांशी वाढ घालणाऱ्या तरुणास चालक इस्माईल शेख यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.