ज्ञानव्यापीच्या तळघरात पूजेच्या स्थगितीला हायकोर्टाचा नकार !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात हिंदी पक्षाला पूजेसाठी अलाहाबाद हायकोर्टानं परवानगी दिली आहे. त्यामुळं ज्ञानव्यापी मशीद कमिटीला झटका बसला आहे. तसेच कोर्टाने वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. पण अर्जात सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे.

अलाहाबाद हायकोर्टानं काय म्हंटल ?

हिंदू पक्षांना मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पूजा करण्याची परवानगी देण्याच्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका ज्ञानव्यापी मशीद समितीनं अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर अलाहाबाद हायकोर्टात आज सुनावणी पार पडलं.

यावेळी हायकोर्टानं म्हंटल की, १७ जानेवारीच्या आदेशाला आव्हान दिल्याशिवाय काहीही करता येणार नाही. यावेळी हायकोर्टानं वाराणसी कोर्टाच्या निर्णयाला स्थगितीचा अर्जही नाकारला आहे. मशीद समितीला ६ फेब्रुवारीपर्यंत अपिलात सुधारणा करण्यास सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.