धुळे-दादर एक्सप्रेसमधून अचानक निघाला धूर, निफाड येथील घटना

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

धुळ्याहून दादरला निघालेल्या एक्सप्रेसच्या बोगीतून अचानक धूर निघू लागला. धावत्या रेल्वेमध्ये ही घटना घडल्याने एक्सप्रेसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. ही घटना निफाड रेल्वे स्थानकादरम्यान घडली.

मध्य रेल्वेवरील नधीक जिल्ह्यातील निफाड रेल्वे स्थानकाजवळ नाशिकाच्या दिशेने लासलगाव येथून सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान निघालेली धावत्या धुळे-दादर एक्सप्रेसच्या डी २ बोगी खालील भागातून धूर निघत होता. धावत्या गाडीतून अचानक धूर निघू लागल्याने बोगीतील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. यामुळे ही रेल्वे गाडी निफाड स्थानकावर थांबवण्यात आली.

ब्रेक चिकटल्याने निघाला धूर
चाकाला प्लॅस्टीकचा ब्रेक चिकटल्याने धूर निघत असल्याचे लक्षात आले. यानंतर सदर ब्रेक दुरुस्त करत गाडी नाशिकच्या दिशेने रावण झाली. निफाड येथे धुळे-दादर एक्सप्रेस थांबवण्यात आल्याने या गाडीतील चाकरमान्यांचे वेळेत कामावर पोहोचण्यासाठी हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.