महिलेकडून प्रौढावर लोखंडी वस्तूने वार

0

जळगाव :- जून्या भांडणाच्या कारणावरुन महिलेने प्रौढावर लोखंडी वस्तूने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शहरातील शिवकॉलनी परिसरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.

रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिवकॉलनी परिसरात निंबा पंडीत सोनवणे (वय ४२) हे अपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. टेलरींगचे काम करून ते आपला उदरिनर्वाह करतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून दिपाली निंबा सोनवणे रा. शिवकॉलनी या महिलेने घरातील लोखंडी वस्तून मारहाण करून चेहऱ्यावर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर निंबा सोनवणे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पो.कॉ. उषा सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.