अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पळवून नेले, चौघांविरुद्ध विरुद्ध गुन्हा

0

पाचोरा–तालुक्यातील बोराडखेडा वेरूळ शिवारामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते मात्र हे जप्त ट्रॅक्टर तहसील कार्यालयात दोन विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी लांबवल्याची धक्कादायक घटना घडली असून त्यांनी तहसीलच्या पथकासोबत हुज्जत घातल्याचा प्रकारही घडल्याने चौघांना विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती अशी की मौजे गोराडखेडा वेरूळ शिवारात अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला तहसील कार्यालयातील पथकाने पकडले होते हे ट्रॅक्टर गिरड येथील अविनाश शरद पाटील यांचे होते. ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेत असताना दोन विना क्रमांकाच्या मोटरसायकल वरून चौघांनी येऊन पथकासोबत च्या व्यक्तींची हुज्जत घालून ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना येथे घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.