सावधान : देशात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरले !

0

२४ तासात ३ हज़ार ८२४ रुग्ण आढळले !

देशात कोरोनाने पुन्हा पुन्हा आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. कोरोनाची ताजी आकडेवारी भितीदायक आहे. गेल्या चोवीस तासात 3 हजार 824 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे कालच्या तुलनेत आज कोरोनाच्या रूग्णांची संख्या 27 टक्क्यांनी वाढली आहेत. शनिवारी 2994 रूग्ण आढळले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवाडीनुसार, देशात 3824 कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आली असून सध्या 18 हजार 389 सक्रिय रूग्ण आहेत.देशात गेल्या चोवीस तासात केरळ, दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये एक एक अशा चार रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील पॉझिटिव्हीटी रेट 2.87 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 41 लाख 73 हजार 335 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी देशात कोरोनाचे 2 हजार 799 डोस देण्यात आल्याचे आकडेवारीवरून सांगण्यात आले. आतापर्यंत देशात कोरोनाचे 2 अब्ज 20 कोटी 66 लाख 11 हजार 814 डोस देण्यात आले आहेत.

दिल्लीमध्ये कोरोना वाढत चालला आहे. दिल्लीत शनिवारी 400 हून अधिक कोरोनाच्या नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात संक्रमण दर 14 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या चोवीस तासात दिल्लीत 2895 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 416 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 26 हजार 529 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.