राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाची निर्घृण हत्या !

0

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क

मावळ तालुक्यामध्ये शिरगावचे विद्यमान सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रवीण गोपाळे (वय – 47) असे हत्या झालेल्या सरपंचाचे नाव आहे.

होते. अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यावर कोयत्याने सपासप वार करून त्यांची हत्या केली. शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे मावळ तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शिरगाव येथील प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली होती. शनिवारी रात्री साईबाबांच्या मंदिरासमोर मित्रांसोबत थांबलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने गोंधळ उडाला आणि जीव वाचवण्यासाठी प्रवीण गोपाळे सैरावैरा पळू लागले. मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर सपासप वार केले.

हल्ल्यात जखमी झालेल्या गोपाळे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

दरम्यान, गोपाळे यांचा खून कोणत्या कारणाने झाला याची माहिती मिळालेली नाही. गोपाळे हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते आणि शेतजमिनीच्या वादातून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.