जळगावात वादळी वार्‍यामुळे कंटेनर उलटून २ ठार… एक जखमी…

0

 

जळगाव, लोकशाही नेटवर्क:

 

जळगाव जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे गुरुवारी शहरानजीक असलेल्या चिंचोली गावाजवळ एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. या वादळी वाऱ्यामुळे चिंचोली गावाजवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे साहित्य घेवून आलेले कंटेनरच उलटले. या कंटेनरखाली दोन मजुरांचा दबले जावून जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. भोला श्रीकुसूम पटेल (सानिकावा, जि.सिवान, बिहार) व चंद्रकांत वाभळे (52), चाळीसगाव, ह.मु.पुणे अशी मयतांची नावे आहेत.

जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकाचा कंत्राट पुण्यातील न्याती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे. रुग्णालयासाठीचे साहित्य घेवून कंटेनर (एन.एल.01 ए.ई.9426) हा उभा असताना गुरुवारी दुपारी अचानक वादळी वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. पावसापासून बचावासाठी कामावरील मजूर आधी शेडच्या आडोशाला उभे राहिले मात्र वादळात शेड उडाल्याने मजूर कंटेनरच्या आडोशाला आले मात्र वार्‍याचा वेग इतका वेगवान होता की कंटेनरही उलटला. या कंटेनरखाली दबले जावून दोघा मजुरांचा करूण अंत झाला तर अफरोज आलम (23, कुंडाळे, जि. पुरण्या, बिहार) हा जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.