‘जिया खान’ प्रकरणात आज महत्वाचा निर्णय येण्याची शक्यता

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

जिया खान (Zia Khan) प्रकरण नवनवीन वळण घेत आहे. त्यातच आज त्याच्या संबंधित सुनावणी कोर्टाकडून हणार आहे. 3 जून 2013 रोजी, अवघ्या 25 वर्षीय अभिनेत्री जिया खानने मुंबईतील तिच्या जुहू अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. आत्महत्या का केली त्याचे कारण अद्यापही समोर आले नाही. त्यावर आज महत्वपूर्ण निर्णय दिला जाऊ शकतो. सूरज पांचोलीवर (Sooraj Pancholi) अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. जुहू पोलीस (Juhu Police) या प्रकरणाचा तपास करत होते आणि तपासादरम्यान, 7 जून 2013 रोजी, जिया खानच्या घरातून पोलिसांना 6 पानांची सुसाइड नोट सापडली होती. यानंतर, 11 जून 2013 रोजी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.