जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात आजपासून गारठा वाढणार आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तीव्र झाल्याने त्या भागातून शीतलहरी राज्याकडे असून गुजरात किनारपट्टीवर वार्याची चक्रीय स्थिती तयार झाल्याने महाराष्ट्रात सोमवारपासून थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
गेले तीन दिवस राज्यात किमान तापमानाचा पारा 12 ते 13 अंशावर आहे. रविवारी यात किंचित घट झाली. मात्र सोमवार (दि. 18) पासून मध्य प्रदेश व गुजरातमधून शीतलहरीचा प्रवास राज्याच्या दिशेने सुरू होत आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात दीड ते दोन अंशांनी घट होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रविवारी राज्यातील बहुतांश शहरांचे तापमान 12 ते 13 अंशावर खाली आले होते.
रविवारचे राज्याचे किमान तापमान
नाशिक 12.6, पुणे 13.2, महाबळेश्वर 13.5, जळगाव 12.7, छत्रपती संभाजीनगर 13.8, ब्रह्मपुरी 13.0, चंद्रपूर 13, गोंदिया 12.8, नागपूर 13, वाशिम 13.8, वर्धा 13.5, यवतमाळ 13.2, परभणी 15.5, नांदेड 17, अकोला 14.5, अमरावती 14.9, बुलडाणा 14.0, मुंबई 22.4, रत्नागिरी 22.6, कोल्हापूर 19.1, मालेगाव 14.2, सांगली 18.2, सातारा 18.1 सोलापूर 19.5, धाराशिव 18.6.