जळगावातील हद्दपार असलेल्या २ गुन्हेगारांना धारधार शस्त्रांसह अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरासह जिल्ह्याची गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रभावी कारवाईचा सपाटाच लावला आहे. त्यातच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले गुन्हेगार शहरातच राहून धारधार शस्त्रांसह दहशत माजवतांना आढळून आले असून, दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

निशांत प्रताप चौधरी आणि स्वप्नील उर्फ गोलू धर्मराज ठाकूर (दोघे राहणार डीएनसी कॉलेज, शंकरराव नगर, जळगाव) अशी दोघांची नावे आहेत. जळगाव शहर आणि जिल्ह्यातील ३५ ठाण्यांतर्गत वारंवार गुन्हे करणारे, गंभीर गुन्ह्यात सहभागी अट्टल गुन्हेगार आणि जनसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सहभागी अट्टल गुन्हेगार आणि जनसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या प्रभावी कारवाई करण्यासाठी जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जिल्ह्यातून हद्दपारीसह मकोका, एमपीडीएच्या प्रभावी कारवाईचे हत्यार उपसले आहे.

एका मागून एक अटकेत

दोघेही आरोपी हद्दपारीचे आदेश झुगारुन सर्रासपणे शहरात फिरत असल्याची माहिती गुप्त माहिती निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यावरुन त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, किशोर पाटील, मुकेश पाटील, नितीन ठाकूर, ललीत नारखेडे, राहुल रगडे, विशाल कोळी, छगन तायडे, किरण पाटील अशांनी निशांत चौधरीला तुकारामवाडीतून ताब्यात घेतले.

त्याच्या अंगझडतीत मतं कापायला वापरतात तास धारधार कोयता सापडला आहे. त्याची चौकशी करून ताब्यात घेताच पांडे डेअरी चौकात त्याचाच मित्र स्वप्नील उर्फ गोलू ठाकूर याला थांबवून विचारणा केली असता, त्याची धांदल उडाल्यावर त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या जवळ हातभार लांब धारधार आन तीक्ष्ण चॉपर सापडले आहे. सोबतच दोघांना अटक देखील करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.