“आधीच माकड त्यात बेवडा.. ”, भुजबळांची जरांगेंवर बोचरी टीका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरूच आहे. जरांगे पाटील आणि छगन भुजबळ कायम एकमेकांवर निशाणा साधत आहेत. रविवारी17 डिसेंबर रोजी भिवंडीत ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

 

 काय म्हणाले छगन भुजबळ?

छगन भुजबळ म्हणाले, आरक्षण मिळूद्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो… मी त्याचा कार्यक्रमच करतो, आरक्षण मिळाल्यावर त्याचा करेक्ट कार्यक्रम करु असं जरांगे म्हणतो. काय बघणार आहेस तू मला… अरे तू तुझी तब्येत सांभाळ. बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या सांभाळ. हा जरांगे आमची लायकी काढतो, काहीही बोलतो, मला म्हणतो येवल्याचा येडपाट आहे. काय सांगणार त्याला… एक म्हण आहे आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. म्हणजे आधीच माकड आणि त्यात बेवडा प्यायला. अरे आमची लायकी तू काय काढतो असंही छगन भुजबळ म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.