धक्कादायक; 14 वर्षाच्या मुलाचा 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; घटनेपूर्वी मोबाईलवर पाहिली होती अश्लील फिल्म…

0

 

बलिया, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

मोबाइल फोनवर अश्लील फिल्म पाहिल्यानंतर 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी यूपीच्या बलिया जिल्ह्यातील नगारा भागात एका 14 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक मोहम्मद फहीम कुरेशी यांनी नोंदवलेल्या अहवालाचा हवाला देत सांगितले की, नगरा पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावातील आठ वर्षीय मुलीवर शनिवारी तिच्या शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाने बलात्कार केला.

दोघेही आधी एकत्र खेळत होते, नंतर..

घटनेच्या वेळी दोघेही एकत्र खेळत होते. पोलिसांनी सांगितले की, खेळत असताना किशोर वयीन मुलाने मुलीला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. कुरेशी यांनी सांगितले की, घटना घडण्यापूर्वी मुलाने मोबाईलवर एक अश्लील फिल्म पाहिली होती.

पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या आईच्या तक्रारीवरून, मुलाविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 नुसार लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.