पारोळ्यातून दोन मोटारसायकल चोरटयांनी लांबवल्या

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

बालाजी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या दुर्गाइ नगरातून दोन मोटरसायकली व एक मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. १५ व १६ डिसेंबरच्या पहाटे घडली. याबाबत रवींद्र सुरेश खोंडे राहणार बालाजी शाळेच्या मागे दुर्गाई नगर पारोळा यांनी पारोळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यांची हिरो एच एफ डीलक्स अंदाजे किंमत २०००० रूपये किमतीची (एम एच १९ सी.डी ९७४१) ही त्यांच्या घरासमोर अंगणात लावलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तसेच चेतन अनिल चौधरी यांची होंडा शाइन २०००० रुपये किमतीची (एम एच १५ एफ एक्स ९०६५) ही देखील त्याच नगरातील घराबाहेरून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तर मंगेश संजय भोई यांच्या विवो वाय ७५ कंपनीच्या दहा हजार रुपये किमतीच्या मोबाईल त्यांच्या घराच्या खिडकीतून कोणीतरी आज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल प्रवीण पारधी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.