चोपड्यातून दोन लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी लांबवली

0

चोपडा : शहरातील मेन रोड परिसरातील शनी मंदिरासमोर असलेल्या समीक्षा ड्रायफ्रूटच्या दुकानाच्या समोरून एक पिग्मी एजंट नियमित पणे पैसे कलेक्शनसाठी आलेला असताना त्याच्या मोटरसायकलला लावलेली २ लाख ३५ हजार रुपयांची बॅग तीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. ५) दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली. वर्दळीच्या मेनरोड परिसरातून भरदिवसा एवढी मोठी रकम असलेली पैश्यांची बॅग चोरीला गेल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ड्रायफ्रूटचे दुकान असून या दुकानावर गुरुवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या महेश पतपेढीमध्ये काम करणारे शरद सुमारास त्यांची दुचाकी (एम एच रामदास बाविस्कर (रा. तारामती नगर, चोपडा) हे पिग्मी एजंट म्हणून काम करतात त्यांची दुचाकी क्रमांक एम एच 19 डी वाय ८४७५) रस्त्यावर उभी करून दुकानदारांकडे गेलेले असताना त्यांनी दुचाकीला लावलेली बॅग अज्ञात तीन चोरट्यांनी चोरून नेली. ते पुन्हा दुचाकीजवळ आले असताना त्यांना पैशांची बँग आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ चोपडा शहर पोलीस ठाणे गाठून फिर्यादी दिली. त्यानुसार पोलिसांनी अद्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. असता अज्ञात चोरट्याने दोन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेली.

सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू

मेन रोड परिसरातील शनी मंदिरासमोर घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आजुबाजुच्या परिसराची पाहणी सुरू केली. यात परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयितांचे कृत्य चित्रित झाल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून तीनही संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.