रांजणगाव येथून दोन बकऱ्या व एका बोकडची चोरी

0

चाळीसगाव;- तालुक्यातील रांजणगाव येथे शेळ्यांच्या शेडच्या जाळ्या तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन बकऱ्या आणि एक बोकड अशा एकूण 25 हजारांच्या शेळ्या चोरून नेल्याचा प्रकार तीन ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आला.

या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती 44 हे शेतकरी असून त्यांची रांजणगाव येथे बकऱ्यांसाठी असणारे शेड मधून अज्ञात चोरट्याने लोखंडी जाळी तोडून दोन बकऱ्या आणि एक बोकड असे एकूण 25 हजार रुपयांचे शेळ्या चोरून नेल्याची घटना दोन ऑगस्ट रात्री नऊ ते तीन ऑगस्ट सकाळी सहा वाजे दरम्यान उघडकिस आली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला हत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर जंजाळे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.