पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 3 वर्षांची शिक्षा, लाहोरमधून अटक

0

लाहोर ;- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तोशाखाना प्रकरणात (Toshakhana case) जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना ही शिक्षा ठोठावली असून 1 लाखांचा दंडही ठोठावला आहे.

यामुळे त्यांना पुढील 5 वर्ष निवडणूक लढता येणार नाही. शिक्षा सुनावल्यानंतर लाहोर येथील जमान पार्क निवासस्थानातून इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने इम्रान खान यांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून ५ वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.