भुसावळात घरफोडी २३ हजारांचा ऐवज लांबविला

0

भुसावळ ;- बंद घराचे कुलूप तोडून घरातील रोकडसह दागिने असा एकूण २३ हजारांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार शहरातील मुस्लिम कॉलनी येथे ३ ऑगस्ट रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, सैय्यद वाशीम सैय्यद रा. मुस्लिम कॉलनी यांच्या बंद घराच्या मुख्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी २० हजार रोख आणि ३ हजारांचे सोनीयाचे मनी असा एकूण २३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार २ ऑगस्ट ते ३ ऑगष्ट च्या दरम्यान घडला . याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.