सेवानिवृत्त महिलेच्या घरात चोरटयांनी मारला डल्ला

0

जळगाव ;- शहरातील एका सेवानिवृत्त महिलेच्या घरी अज्ञात चोरटयांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील ५८ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पांडुरंग हौसिंग सोसायटी संभाजी नगर येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी सरला भगवान भामरे वय ६७ यांच्या घराचा अज्ञात चोरटयांनी कांडीकोयंडा आणि कुलूप तोडून घरातील ३० हजार रुपयांच्या सोन्याच्या पाटल्या,३६०० किमतीचे कानातले ,१२ हजारांची सोन्याची पोत , अंगठ्या ,चांदीचा ग्लास ,६ हजारांचो रोकड असा सुमारे ५८ हजारांचा ऐवज चोरटयांनी १९ जून २०२३ ते ४ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला . याप्रकरणी सरला भामरे यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस संजय सपकाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.